Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भीषण अपघातात आई सह ५ वर्षीय बलिकेचा मृत्यू

accident
, मंगळवार, 23 मे 2023 (21:18 IST)
नाशिक येथील मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका ते आडगाव उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात आई सह ५ वर्षीय बलिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या नादुरुस्त आयशरला कंटेनरने मागून धडक दिल्याने अपघात झाला. या घटनेत ३२ वर्षीय नफीझा शेख यांच्यासह त्यांची ५ वर्षीय चिमुकली तरननुम शेख हिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अफझल शेख आणि आयशा शेख ही ६ वर्षीय चिमुकलीसह कंटेनर चालक गंभीर जखमी झाले आहेत.
 
दरम्यान, मिळालेल्या माहिती नुसार, द्वारका ते आडगाव दरम्यान धुळ्याच्या दिशेने नादुरुस्त झाल्यामुळे आयशर उड्डाणपुलावर उभा होता. सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास इगतपुरी येथून धुळ्याच्या दिशेने जात असलेले कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर थेट उभ्या असलेल्या आयशर जाऊन धडकला. नाशिक तालुक्यातील गौळाणे येथील शेख कुटुंब या कंटेनरमधून प्रवास करत होते. धडक इतकी भीषण होती की कंटेनरची चालक केबिन त्यात चक्काचूर झाली. यात आई नफीझा शेख यांच्यासह त्यांची ५ वर्षीय चिमुकली तरननुम शेख हिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, नफीझा शेख यांचे पती अफझल शेख व ६ वर्षाची दुसरी मुलगी आयशा शेख हिच्यासह कंटेनर चालक गंभीर जखमी झाले आहेत. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

त्र्यंबकेश्वर मंदिरात नितेश राणेंकडून महाआरती