Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pune : कोंढवा भागात बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे मोठा अपघात

accident
, सोमवार, 22 मे 2023 (10:22 IST)
पुण्यातील कोंढव्या भागात एनआयबीएम रोडवर उंड्री येथे एका खासगी बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे बसने 5-6 वाहनांना दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एनआयबी रोड जवळ इशरत बाग जवळ उंड्रीच्या दिशेने चालत्या बसचे चढणावर रात्री आठ वाजेच्या सुमारास बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे आणि बस रिव्हर्स आल्यामुळे बसने 5 ते 6 वाहनांना धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक पुन्हा सुरळीत सुरु केली.  
 
Edited by - Priya Dixit  
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राजा राममोहनराय जयंती 2023 : आधुनिक भारताचे जनक "राजा राम मोहन रॉय''