Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात सोमवारी 6119 कोंबड्यांचा मृत्यू

राज्यात सोमवारी 6119 कोंबड्यांचा मृत्यू
, मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (07:28 IST)
राज्यात सोमवारी 6119 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात बगळे, पोपट, कावळा चिमण्यांसह इतर सात पक्ष्यांचा समावेश आहे. सर्व पक्ष्यांचे नमुने भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशूरोग संस्थेत तसेच पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.  
 
राज्यात काही कोंबड्या आणि बदकांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे आढळून आल्याने या पक्ष्यांचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला तो परिसर “नियंत्रित क्षेत्र” म्हणून घोषीत करण्यात आलं आहे. या परिसरांमध्ये प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 अन्वये निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. बर्ड फ्लूमुळे कोंबड्या दगावलेल्या पोल्ट्री फार्मपासून 1 किमी अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्टा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून 1,09,426 कुक्कुट पक्षी (यात नवापूर जि. नंदुरबार येथील 31,400पक्षी समाविष्ट), 44, 686 अंडी व 63,864 किलो खाद्य नष्ट करण्यात आले आहेत. या पक्ष्यांच्या मालकांना आजतागायत 34.06 लाख रुपये अनुदान म्हणून वाटप करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुठले फासे फिरवणार आहेत हे आम्हाला माहीत नाही : नवाब मलिक