बीडमध्ये मटण व इतर पदार्थ खाल्ल्याने ७० लोकांना विषबाधा

बुधवार, 12 जून 2019 (18:04 IST)
बीड शहरातील धानोरा रोड भागात कंदुरीच्या कार्यक्रमात मटण व इतर पदार्थ खाल्ल्याने जवळपास ५० ते ७० लोकांना विषबाधा झाली आहे. सर्वांवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
बीड शहरातील धानोरा रोड भागात जागरण गोंधळानिमित्त कंदुरीचा कार्यक्रम मंगळवारी रात्री ठेवण्यात आला होता. रात्री उशीरा जेवणे सुरु झाली. ११ वाजण्याच्या सुमारास एकामागून एकास त्रास होऊ लागला. काहींना उलट्या तर काहींना मळमळ होऊ लागल्याने तात्काळ संबंधित व्यक्तींना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ५० जणांना अॅडमिट करण्यात आले होते. त्यामध्ये १४ लहान मुलांचा समावेश आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख खासदार अमोल कोल्हे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली