भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे.मंगळवारी महाराष्ट्रात 86नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.राज्याच्या आरोग्य विभागांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्रात कोरोनाचे 86 नवीन रुग्ण आढळले. या वर्षी 1 जानेवारीपासून एकूण 959 लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. राज्य आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 435 रुग्ण बरे झाले आहेत. 510 सक्रिय रुग्ण आहेत. सोमवारपासून 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी नागपूरमध्ये 2, चंद्रपूर आणि मिरजमध्ये प्रत्येकी 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
86 नवीन रुग्णांपैकी 26 जण मुंबईतील, 24 जण पुण्यातील, 9 जण ठाण्यातील, 6 जण नवी मुंबईतील, प्रत्येकी 1 जण कल्याण आणि उल्हासनगरातील, 3 जण पिंपरी-चिंचवडमधील, कोल्हापूर आणि नागपूरमधील प्रत्येकी 2जण सांगलीतील आहेत. या वर्षी मुंबईत एकूण 509 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 503 जण मे महिन्यातच आढळले आहेत.
या वर्षी आतापर्यंत 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी 13 जणांना किडनीचे आजार, कर्करोग, मधुमेही केटोअॅसिडोसिस, फुफ्फुसांचे आजार, हृदयाच्या लयीत अडथळा आणि पार्किन्सनसारखे आजार होते. महाराष्ट्रात जानेवारीपासून12,880 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे आणि पॉझिटिव्ह रुग्णांवर नियमित उपचार केले जात आहेत.