सांगली जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील 9 जणांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. माणिक यल्लप्पा व्हनमोरे आणि त्याचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे यांच्या कुटुंबाचा यात समावेश आहे.
कुटुंबाने आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. सुरुवातील या सगळ्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे सांगितले जात होते मात्र हे कुटुंब आर्थिक कारणांमुळे तणावत असल्यामुळे सर्वांनी आत्महत्या केल्याची पुष्टी होत आहे. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन सुरू आहे.
म्हैसाळ येथील डॉक्टर माणिक यल्लाप्पा व्हनमोरे यांच्या कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. मृतांमध्ये डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे, रेखा मानिक वनोरे, प्रतिमा वनमोरे, आदित्य वनमोरे आणि पोपट येलाप्पा वनमोरे, अर्चना वनमोरे, संगीता वनमोरे, शुभम वनमोरे यांचा समावेश आहे.
आर्थिक कारणांमुळे हे कुटुंब तणावात होते आणि त्यामुळे आलेल्या नैराश्यातून कुटुंबातील 9 सदस्यांनी एकत्रितपणे आत्महत्या केल्याचे समजते.