Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यावर्षी सरासरीच्या 98 टक्के पावसाची शक्यता, स्कायमेटचा अंदाज

mumbai rain 2
, मंगळवार, 12 एप्रिल 2022 (21:22 IST)
राज्यात यावर्षी चांगला पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला. यावर्षी सरासरीच्या 98 टक्के पावसाची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यात 880 मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये स्कायमेटने सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवला होता. तो या कायम ठेवलाय. ला निना आणि एल निनोचा प्रभाव मान्सूनवर पडणार नाही असं स्कायमेटने म्हटलंय. राज्यात तापमानात किंचित घट झाली आहे. 
 
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाळी स्थिती असल्यामुळे पारा खाली आलाय. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात आणखी दोन ते तीन दिवस पावसाळी स्थिती राहणार आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. सोलापुरात काल वादळी वारे, गारांसह मुसळधार पाऊस झाला. यामुळे, शेतीसह घरांचं मोठं नुकसान झालं. कासेगावांत गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेल्या द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

होय, भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, वसंत मोरे यांची कबुली