Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डंपरची धडक लागून दुचाकीस्वार पिता- पुत्र ठार

डंपरची धडक लागून दुचाकीस्वार पिता- पुत्र ठार
, मंगळवार, 12 एप्रिल 2022 (16:21 IST)
गोटखिंडी फाट्याजवळ पेठ सांगली सत्यावर वळणावर एका डंपरची धडक लागून पिता -पुत्र जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी झाला .अंकुश शिवाजी साळुंखे वय वर्ष 40 आणि आदित्य शिवाजी साळुंखे वयवर्षे 13 दोघे रा.हजारमाची राजाराम नगर कऱ्हाड असे या अपघातात मृत्यू मुखी झाले आहे. तर या अपघातात अंकुश यांची पत्नी सोनाली अंकुश साळुंखे वय वर्ष 36 या गंभीर जखमी झाल्या आहे.त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातानंतर डंपर चालक पसार झाला असून त्याचा शोध सुरु आहे. 
 
अंकुश हे बांधकाम व्यवसायिक होते ते मंगळवारी आपल्या पत्नी सोनाली आणि मुलगा आदित्य ला घेऊन दुचाकीवरून नातेवाईकांना भेटण्यासाठी सांगलीला गेले होते. ते सांगलीतून हजारामाची परत येताना सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गेटखिंडी फाट्याजवळ पूर्वेकडून वळणाऱ्या एका भरधाव डंपर ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात अंकुशचे शीर शरीरापासून वेगळे झाले होते. तर आदित्यच्या डोक्यावरून देखील वाहन गेले होते. या अपघातात अंकुश आणि आदित्य हे जागीच ठार झाले.  
 
अपघाताची माहिती मिळतातच आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. या अपघातांनंतर डंपर चालक पसार झाला असून त्याचे शोध घेण्याचे काम मार्गावरील लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज ने सुरु आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

CSK vs RCB:चेन्नईचा सामना रॉयल चॅलेंजर्सशी, गुणतालिकेत अव्वल येण्यासाठी मुकाबला