Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाप्परे, खत प्रकल्पात १ दिवसाचा स्त्री अर्भक आढळले

बाप्परे, खत प्रकल्पात १ दिवसाचा स्त्री अर्भक आढळले
, शनिवार, 29 ऑक्टोबर 2022 (21:19 IST)
नाशिकमध्ये पांडवलेणी जवळ असलेल्या खत प्रकल्पात १ दिवसाचा स्त्री अर्भक आढळून आले आहे. प्लॅस्टिकच्या पिशवीत असलेले हे अर्भक कचरा वेचणार्‍याला आढळून आल्याने ही बाब समोर आली आहे.
 
एकीकडे स्त्रीभ्रूण हत्या, महिला सबलीकरण, महिलांचे अधिकार, मुलींचे आरोग्य, शिक्षण आदी बाबींवर सरकारी पातळीवर अनेक योजना राबवल्या जात आहेत. सामाजिक स्तरावरही याबाबत मोठ्या प्रमाणात प्रबोधनाचे करी सुरू आहे. तरीही अजूनही अनेक कळ्या उमलण्या आधीच त्यांना नष्ट करण्याचे प्रकार नेहमीच समोर येत असतात. शहरातील पांडवलेली डोंगराच्या मागील बाजूस असलेल्या खतनिर्मिती प्रकल्पात अशीच एक घटना समोर आली आहे.
 
नाशिक मनपाच्या घंटागाड्या दररोज सहा विभागांच्या माध्यमातून फिरत असतात. दरम्यान शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता एका घंटागाडीतून आलेल्या कचर्‍याचे कचरा वेचक हे विलगीकरण करत असताना त्यांना एका पांढर्‍या रंगाच्या पिशवीत कापडात काहीतरी वस्तू गुंडाळलेली दिसली. पिशवी उघडली असता त्यात अंदाजे एका दिवसाचे मृत स्त्री जातीचे अर्भक असल्याचे लक्षात आले. हा प्रकार त्या महिलेने खत प्रकल्पावरील अधिकार्‍याला सांगितल्यानंतर संबंधित अधिकार्‍याने घनकचरा संचालक डॉ. आवेश पलोड यांना या घटनेची माहिती दिली. अनैतिक संबंधातून अर्भक जन्माला आले असावे असा संशय असून पोलीस मातेचा शोध घेत आहे. दरम्यान नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. प्रशांत शेटे, बालरोग तज्ञ डॉ. विनोद पावसकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. नाशिक महापालिकेच्या पथकाने तपासणी केली असता सदरचे स्त्री अर्भक हे 24 तासांच्या आतच जन्माला आले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सदर प्रकरणी प्राथमिक तपासणी केल्यानंतर अर्भक पोलिसांना सुपूर्द करण्यात आले. तर या प्रकरणी मनपाचे घनकचरा संचालक डॉ. आवेश पलोड म्हणाले कि, ‘खत प्रकल्पावर कचरा विलगीकरण करताना कचरा वेचकाला एका पिशवीत मृत स्त्री जातीच्या अर्भक आढळून आले आहे, कोणीतरी कचरा टाकताना घंटागाडी सदरच्या गाडीत टाकल्याचा संशय असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय म्हणता, अधिवेशनासाठी सुमारे 95 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित