ठाणे : खंडणी मागितल्याचा आरोप ठाणे जिल्ह्यातील मनसेच्या एका मोठ्या नेत्यावर करण्यात आला आहे. देशात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. तसेच सर्वीकडे प्रचार सुरु आहेत. तर ठाण्यात एक मोठी बातमी समोर आली आहे. एक मोठा गंभीर आरोप मनसे नेत्यावर केला गेला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश जाधव हे राज ठाकरे यांचे जवळचे विश्वासातील व्यक्ती असून यांच्यावर लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशी माहिती मिळाली की, ५ कोटींची खंडणी त्यांनी एका सराफाकडून मागितली म्हणून त्यांच्या वर गंभीर आरोप करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यासोबत या प्रकरणात ठक्कर नावाचा एक व्यक्ती देखील सहभागी आहे.
तसेच अविनाश जाधव यांच्या विरोधात जीवे मारण्याची धमकी, खंडणी मागणे, कारस्थान कात रचणे या कलमांखाली गुन्हा नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांनी झवेरी बाजारपेठेतील एका व्यापाऱ्याला धमकावून खंडणी मागण्याच्या आरोप त्यांच्यावर आहे. तसेच अविनाश हे जनतेचे प्रश्न नेहमी उचलून धरून ते नेहमी मनसेच्या विविध आंदोलनात पुढे असतात. अविनाश जाधव हे नेहमी पुढे असतात आणि चर्चेत असतात.
Edited By- Dhanashri Naik