Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जॅक्सनच्या वधासाठी वापरलेले पिस्तूल पाहण्याची संधी

जॅक्सनच्या वधासाठी वापरलेले पिस्तूल पाहण्याची संधी
, शनिवार, 24 डिसेंबर 2022 (20:46 IST)
हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनच्या वधासाठी वापरलेले पिस्तूल पाहण्याची संधी नाशिककरांना मिळाली आहे. हे पिस्तूल नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वस्तू संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आले  आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी २१ डिसेंबर १९०९ रोजी ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनची गोळ्या घालून हत्या केली होती. नाशिकच्या  विजयानंद थिएटरमध्ये ही घटना घडली होती. या घटनेत वापरलेले पिस्तूल ३१ डिसेंबरपर्यंत दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत नागरिकांना बघता येणार आहे.
 
नाशिकच्या जुलमी कलेक्टर जॅक्सनची हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी विजयानंद थिएटरमध्ये गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेला बुधवारी (दिनांक २१ रोजी) ११३ वर्षे पूर्ण झाली. ज्या पिस्तूलने हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध केला होता, ते पिस्तूल सार्वजनिक वाचनाच्या वस्तू संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलं होतं आणि हे पिस्तूल आता नाशिककरांना बघण्यासाठी उपलब्ध आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाच्या वतीने नाशिककरांना हे पिस्तूल पाहण्याचा आवाहन करण्यात येत आहे.
 
हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी  जुलमी ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याची हत्या करण्याचा ठरवलं होतं. जॅक्सनची मुंबई येथे बदली करण्यात आली. त्यामुळे ते शक्य होणार नव्हतं. नाशिक येथे जॅक्सनला ठार मारणं सोपं होतं. मात्र जॅक्सनची मुंबई येथे बदली करण्यात आली. त्यावेळेला नाशिक मधील विजयानंद थिएटरमध्ये ‘शारदा’ या नाटकाचा प्रयोग जॅक्सनच्या निरोप समारंभासाठी घ्यायचा ठरलं. जॅक्सनला नाटकाची आवड होती, त्यामुळे तो हे नाटक पाहण्यासाठी आवर्जून आला. त्याचवेळी कान्हेरे यांनी संधी साधली आणि जॅक्सन वर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या या घटनेत जॅक्सन हा जागीच ठार झाला. २१ डिसेंबर १९०९ रोजी नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये ही सर्व घटना घडली होती. कान्हेरे यांना या कामी कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे यांची देखील साथ मिळाली होती. या घटनेनंतर कान्हेरे कर्वे आणि देशपांडे या तिघांवरही खटला चालवण्यात आला. त्यांना १९ एप्रिल १९१० रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली होती.
 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डिजिटल करन्सीला नोटांच्या छापखान्यातील प्रेस कामगारांचा विरोध