Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

पुण्यात सतरंजीमुळे वाचले तरुणीचे प्राण

suicide
, मंगळवार, 21 फेब्रुवारी 2023 (08:32 IST)
पुणे :मुंबई-बेंगळूर बाह्यवळण मार्गावरील नवले पुलावरून उडी मारत रविवारी रात्री एका तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वाहतूक पोलीस तसेच नागरिकांनी प्रसंगावधान राखत आणलेल्या सतरंजीवर पडल्याने 50 फूट उंचीवरून उडी मारल्यानंतरही ही तरुणी बचावली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. नैराश्यातून तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
 
नवले पुलावर रविवारी रात्री 24 वर्षीय तरुणी थांबली होती. ती जोरजोरात ओरडत होती. तसेच पुलावरून उडी मारण्याच्या बेतात होती. तिचा आवाज नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी ऐकला. वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी मिथून राठोड, अमर कोरडे, नागरिक राजू जगताप, सागर बर्दापुरे, प्रदीप जोरे, श्रेयस तांबे यांनी तरुणीला उडी मारू नको, असे सांगितले. प्रसंगावधान राखून पोलीस आणि नागरिकांनी नवले पूल परिसरातील एका हॉटेलमधून सतरंजी आणली. पोलीस आणि नागरिक सतरंजी धरून थांबले. तिला वाचविण्यासाठी काही जण पुलाकडे निघाले. तेवढय़ात तरुणीने पुलावरुन उडी मारली. ती सतरंजीवर पडली. या घटनेत तरुणीला किरकोळ दुखापत झाली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणीने प्रेमप्रकरणातून नवले पुलावरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शक्मयता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून कांदा अग्निडाग कार्यक्रमासाठी दिले निमंत्रण