प्रेमभंग झाल्याच्या कारणातून युवकाने पोलीस ठाण्यासमोरच आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी राजेश रामसेवक भारती (वय 28, रा. गंगासागर कॉलनी, गवळी चाळ, गंगापूर रोड, नाशिक) याने प्रेमभंग झाल्याच्या कारणावरून आयुष्याला कंटाळून सरकारवाडा पोलीस ठाण्यात स्टकील नावाचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात राजेश भारती या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.