Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने चिमुरड्याला चिरडले

a little boy was crushed by a tractor transporting sand Marathi वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने चिमुरड्याला चिरडलेRegional News In Webdunia Marathi
, बुधवार, 29 डिसेंबर 2021 (08:27 IST)
इब्राहिम शेख दूध आणण्यासाठी दोघा मुलांना दुचाकीवरून घेऊन चालले होते. अपघात होताच ट्रॅक्टर चालक पसार झाला. आक्रमक झालेल्या नागरिकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली.
संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन अाडीच वर्षे वयाचा मोहम्मद इब्राहिम शेख हा जागीच ठार झाला.
तर त्याचा भाऊ अबुहुरेरा इब्राहिम शेख (वय ७) हा गंभीर जखमी झाला. रविवारी रात्री ७.३० वाजता ही घटना घडली. जखमी बालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
इब्राहिम शेख दूध आणण्यासाठी दोघा मुलांना दुचाकीवरून घेऊन चालले होते. अपघात होताच ट्रॅक्टर चालक पसार झाला. आक्रमक झालेल्या नागरिकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली.
या घटनेने वातावरण तणावपूर्ण होते. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी नागरिकांना शांत केले. पोलिसांनी विनानंबरचा ट्रॅक्टर ताब्यात घेत चालकावर गुन्हा दाखल केला आहे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित; पुढील अधिवेशन 28 फेब्रुवारी 2022 रोजी नागपूर येथे