Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्याला पुन्हा गारपिटीनं तडाखा, बळीराजा संकटात

राज्याला पुन्हा गारपिटीनं तडाखा, बळीराजा संकटात
, मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (21:53 IST)
औरंगाबादच्या  वैजापूर तालुक्यतील अनेक गावांना मुसळधार पावसाने आणि गारपिटीने तडाखा बसला आहे. वैजापूरच्या देवगाव ,शनि चेंडूफळ, बाजाठाण , गाढेपिंपळगाव, मांजरी फाटा , आणि  गंगापुर मध्ये गारपीट आणि पाऊस झाला. तर कन्नड आणि पैठणमध्ये ही तुफान पाऊस झाला. 
 
विदर्भातही अवकाळी पावसानं थैमान घातलंय. अमरावतीच्या चांदुर बाजार तालुक्याला सकाळीच पाऊस आणि गारपीटीनं झोडपून काढलं. वणी बेलखेडा आणि घाटलाडकी परिसरात तुफान गारपीट झाली. या गारपिटीने संत्र्याचा आंबिया बहार हातातून जाण्याची शक्यता आहे.  
 
तूर, हरभरा, कांदापिकालाही गारपीटीचा फटका बसण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात गारपीट झाली. नरखेड तालुक्यातील वाढोना आणि मेंढला परिसरात गारपीट झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे. उशिरा लागवड केलेल्या फुलोरा अवसतेत असलेल्या तूर आणि हरभरा पिकांसाठी हा पाऊस नुकसानदायी आहे. आणखी दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 
 
नागपूर जिल्ह्यात गारपीट झालेली आहे. नरखेड तालुक्यातील वाढोना आणि मेंढला परिसरात गारपीट झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे. अवकाळी पावसानं संत्रा फळबागेचं नुकसान झालं आहे.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'ही' निवडणूक आता फेब्रुवारीत होणार