Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली
, मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (21:47 IST)
येत्या २ जानेवारी रोजी राज्यभर होऊ घातलेल्या एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयासोबत ही परीक्षा पुन्हा कधी घेतली जाणार, याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. आयोगाने जारी केलेल्या निवेदनामध्ये परीक्षेचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. 
 
राज्य लोकसेवा आयोगातर्फे मंगळवारी २८ डिसेंबर रोजी यासंदर्भातलं परिपत्रक आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आलं आहे. “राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे”, असं या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई महापालिकेत नगरसवेकांच्या संख्येत वाढ होणार, विधेयक मंजूर