Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खडसेंना धक्का; भुसावळच्या ६ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई

eakath khadse
, बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (15:34 IST)
जळगाव  – जिल्ह्यातील भुसावळ नगरपालिकेतील एकनाथ खडसे यांच्या समर्थकांवर मोठी कारवाई झाली आहे. येथील माजी नगराध्यक्ष १० नगरसेवकांना ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, नगरपालिकेचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या एक दिवस आधीच तत्कालीन भाजपच्या नगराध्यक्षांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र याच समर्थकांवर आता मोठी कारवाई झाली आहे. त्यामुळे जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
 
भाजपच्या गिरीश महाजनांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी एकनाथ खडसे पुरेपर प्रयत्न करत आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या कारवाईने खडसे आणि राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला आहे. तत्कालीन भाजपचे नगराध्यक्ष यांनी १७ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. भाजप नगरसेविका पुष्पा बतरा यांनी २८ डिसेंबर २०२१ रोजी सदर माजी नगराध्यक्ष व नगरसेविकांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी याप्रकरणी अंतिम सुनावणी करत माजी नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांना ६ वर्षासाठी केले निलंबित केल्याचे आदेश पारीत केले आहेत.
 
निलंबित झालेल्या सदस्यांची नावे
रमण देविदास भोळे, अमोल इंगळे, लक्ष्मी रमेश मकासरे, मेघा देवेंद्र वाणी, बोधराज दगडू चौधरी, शोभा अरुण नेमाडे, प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे, किरण भागवत कोलते, शैलजा पुरुषोत्तम नारखेडे, पुष्पाताई रमेशलाल बतरा.
 
Edited By - Ratandeep Ranshoor 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यादव दाम्पत्याचा शिंदे गटात प्रवेश