Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार

आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार
, मंगळवार, 19 डिसेंबर 2023 (21:24 IST)
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. तसेच, आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेण्याची घोषणाही केली.
 
यावेळी सीएम शिंदे म्हणाले की, 'ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी सरकारची भूमिक आहे. ज्या त्रुटी आहे त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवणारा आरक्षण देणार आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल एक महिन्यात येईल. त्यानंतर फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन बोलावून आम्ही आरक्षण देणार,' असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
 
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणतात, 'कुणबी लिहिले आणि प्रमाणपत्र दिले, एवढे सोपे काम नाही. कुणीही काळजी करण्याची गरज नाही, जो पात्र आहे, त्यांना सुलभपणे प्रमाणपत्र मिळतील. कुणबी पुरावे हे उर्दू, फारशी, मोडी लीपीमध्ये आहेत, त्यामुळे कागदपत्रांची सखोल तपासणी करुनच प्रमाणपत्र दिले जात आहे. तेलंगणा सरकारकडेही अनेक कागदपत्रे आहेत. तेलंगणा सरकारचीही आपल्याला या कामामध्ये मदत होणार आहे. तिथे काँग्रेसचे सरकार आहे, त्यामुळे काँग्रेस नेत्यांची आपल्याला मदत होईल.'
 
Edited by -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कलम 370 वर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे संघराज्य व्यवस्था कमकुवत?