Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपूर जिल्ह्यात एकूण ७ हजार २२९ नवे कोरोना रुग्ण

नागपूर जिल्ह्यात एकूण ७ हजार २२९ नवे कोरोना रुग्ण
, गुरूवार, 22 एप्रिल 2021 (08:12 IST)
नागपूरमध्ये कोरोनाच्या संसर्गाची दाहकता कायम असून बुधवारीदेखील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सात हजारांहून वर गेली. मात्र, अनेक दिवसांनी नव्या बाधितांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या जास्त होती. जिल्ह्यातील तब्बल ७ हजार २६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. 
 
अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात एकूण ७ हजार २२९ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यात शहरातील ४ हजार ७८७ व ग्रामीणमधील २,४३४ रुग्णांचा समावेश आहे, तर ९८ जणांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये ग्रामीणमधील ३८, शहरातील ५२ व जिल्ह्याबाहेरील ८ जणांचा समावेश होता.
 
एकूण २४ हजार १६३ चाचण्या झाल्या. यात आरटीपीसीआरच्या १५ हजार ३५६ तर ॲन्टिजनच्या ८ हजार ८०७ चाचण्यांचा समावेश आहे.
 
नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ४३ हजार ५८९ कोरोनाबाधित आढळले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ६ हजार ५७५ झाली आहे. यात जिल्ह्याबाहेरील ९७६ रुग्णांचा समावेश आहे.
 
नागपूर जिल्ह्यात ७१ हजार ५५७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यात शहरातील ४३ हजार ७५४ व ग्रामीणमधील २७ हजार ८०३ बाधितांचा समावेश आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आणि हिंदू महासभा रुग्णालयात ५० जणांना ऑक्सिजन पुरवला