सध्या राज्यात पावसाचा उद्रेक सुरु आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रवासी घेऊन जाणारा ट्रक काल रात्रीच्या सुमारास अहेरी तालुक्यातील पेरमेली नाल्यात वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुरात वाहून गेल्या ट्रक मध्ये पाच ते सहा प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.ही माहिती प्रशासनाला मिळताच आज पहाटेपासून एसडीआरएफच्या पथकामार्फत शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. शोध मोहीमेदरम्यान नाल्यात अडकून असलेल्या ट्रकमध्ये तीन मृतदेह सापडले आहेत. उर्वरीत प्रवाशांचा शोध सुरु आहे. उर्वरीत लोक हे सुरक्षीत आहेत की त्यांच्यासोबतही काहीअप्रिय घटना घडली आहेत. याबाबत एसडीआरएफ पथक शोध घेत आहेत. गावपातळीवर सक्रीय असलेल्या यंत्रणांनीही याबाबत शोधमोहीम सुरु केली आहे.
पुरात वाहून गेलेले हे ट्रक कुठे जात होते , हे अद्याप समजू शकले नाही. ही घटना काल रात्री घडल्यामुळे आज पहाटेपासून एसडीआरएफ पथक, गावास्तरावरील यंत्रणा यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली ते भामरागडया राष्ट्रीय महारमार्गावरील कुमरगुडा आणि पेरमिली नाल्यावर पूरस्थितीनिर्माण झाल्याने हा मार्ग रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला होता. तशी माहितीही प्रशासनाने दिली होती. दरम्यान, गडचिरोलीत अतिवृष्टी झाली. या भागात नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे.