ट्विटवर ‘चौथे ट्विटर मराठी भाषा संमेलन २०१९’चे आयोजन ११ ते १३ जानेवारी या तीन दिवसांमध्ये करण्यात आले आहे. ट्विटरसारख्या माध्यमावर जास्तीत जास्त नेटकऱ्यांनी मराठीमध्ये लिहावं आणि त्या माध्यमातून मराठीचा प्रसार व्हावा या उद्देशाने #ट्विटरसंमेलन होत आहे. @MarathiWordया अकाऊण्टवर या संमेलनाची अधिक माहिती मिळेल. #ट्विटरसंमेलन हाच या संमेलनाचा मुख्य हॅशटॅग असणार आहे. या हॅशटॅगबरोबरच ट्विपल्स त्यांनी लिहीलेल्या साहित्यासाठी देण्यात आलेला विशेष हॅशटॅगही वापरु शकतात. यामध्ये एकूण बारा हॅशटॅग देण्यात आले असून त्यात कविता, ब्लॉग, कथा, शाळा, खमंग अशा वेगवेगळ्या विषयांवरील हॅशटॅग देण्यात आले आहे.
या १२ विषयांवर #ट्विटरसंमेलन मध्ये करु शकता ट्विट
#माझीकविता
#ट्विटकथा
#माझाब्लाॅग
#माझीबोली
#साहित्यसंमेलन
#वाचनीय
#हायटेकमराठी
#बोलतोमराठी
#मराठीशाळा
#भटकंती
#खमंग
#माझेवेड