Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
, रविवार, 13 मार्च 2022 (10:02 IST)
अमरावती-दरियापुर रोडवर येथे काल रात्री  काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा वाहन अपघातात मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या अपघातात युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांच्या गाडीचा अपघात होऊन काँग्रेसचे महासचिव रोहित देशमुख यांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातात पंकज मोरे, परीक्षित जगताप, वैभव देशमुख जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.  हे सर्व जण अमरावतीहून परत येत असताना वाहनाचा अपघात झाला. या अपघातात रोहित देशमुख मृत्युमुखी झाले. तर इतर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जम्मू-काश्मीर: सुट्टीवर असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळ्या झाडून हत्या