कल्याणचे सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे मठाधिपती श्री नवनितानंद मोडक महाराज यांचे पुणे-सातारा महामार्गावर सातारा नजीक त्यांचे वाहन दुभाजकाला धडकून गंभीर दुखापत होऊन त्यांचे निधन 19 डिसेम्बर रोजी पहाटे झाले. चालकाला झोप अनावर झाल्यामुले वाहन अनियंत्रित होऊन त्यांची सुमो गाडी दुभाजकाला धडकली आणि अपघात झाला.
हिंदूंमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांना धर्मकार्यासाठी बळ मिळण्यासाठी त्यांनी मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात 'श्री स्वामी समर्थ' मठाची स्थापना केली. ते हिंदूंना धर्मकार्यासाठी बळ मिळो या साठी मठात यज्ञ करायचे. त्यांनी समितीच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आणि प्रांतीय हिंदू अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांना मार्गदर्शित करण्याचे कार्य केले. राज्यभरात त्यांचे सहस्रो अनुयायी त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनावर काम करत आहे. त्यांच्या निधनाने त्यांच्या अनुयायींमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी श्री स्वामी समर्थ मठ कल्याण येथे ठेवले जाणार आहे.