Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश !आरोपींना अटक

webdunia
शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (21:22 IST)
पोलिसांनी टाकलेल्या नियोजनबद्ध धाडसी छाप्यामुळे राहुरीत अवैध धंदेवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून राहुरी खुर्द येथील एका हॉटेलमध्ये चालू असलेल्या सेक्सरॅकेटचा पर्दाफाश केला.
यातून तीन पीडीत महिलांची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी राहुरी व श्रीरामपूर येथील दोनजणांना अटक करण्यात आली आहे.
हॉटेलात वेश्याव्यवसाय चालू असल्याची गोपनीय खबर श्रीरामपूर विभागाचे डीवायएसपी संदीप मिटके यांना मिळाली. राहुरीतील हॉटेल न्यू भारत तसेच राहुरी ते शिर्डी रोडवरील हॉटेल न्यू प्रसादच्या शेजारी वेश्याव्यवसाय चालू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
त्याप्रमाणे राहुरी शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकून तीन पीडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.
महिला कॉन्स्टेबल स्वाती कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सय्यद फरहाद इरशाद अहमद (वय 34, रा. बुवासिंद बाबाचा दर्गा समोर राहुरी), याच्याविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला कॉन्स्टेबल मीना नाचन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राजू शिवाजी इंगळे (रा. इंदिरानगर वार्ड नंबर 6, श्रीरामपूर) याच्या विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे गुरनं.25/2022 महिलांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी सूवर्ण संधी, रेल्वेत जागा