Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बहुचर्चित सोनवणे जळीतकांडातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

jail
, गुरूवार, 8 सप्टेंबर 2022 (20:53 IST)
राज्यात खळबळ उडवून देणार्‍या मनमाड पानेवाडी येथील मालेगांवचे अप्पर जिल्हाधिकारी सोनवणे जळीतकांडातील आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी ३ आरोपींना जन्मठेप झाली असून मुख्य संशयित आरोपी पोपट शिंदे याचा याआधी मृत्यू झाला आहे. या हत्याकांडाला जवळपास ११ वर्षे झाले असून घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. या जळीत हत्या कांड प्रकरणातील ३ आरोपींना आता जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
 
याप्रकरणी ३ आरोपींना शिक्षा झाली असून त्यांची नावे मचिंद्र सूरडकर, राजू शिरसाठ, अजय सोनवणे असून यांना जन्मठेप ठोठावली आहे. मुख्य संशयित आरोपी पोपट शिंदे याचा याआधी मृत्यू झाला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. हे जळीत हत्याकांड २५ जानेवारी २०११ ला घडले होते.
 
काय होते प्रकरण?
 
मनमाडजवळच्या पानेवाडी शिवारात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भेसळ माफियांनी तत्कालीन मनमाड अप्पर जिह्वाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळून मारल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभर पडले होते. या प्रकरणातील प्रमुख आरोपी पोपट शिंदेसह अकरा जणांना आरोपी करण्यात आले होते. मात्र सोनवणे यांना जाळून मारण्याच्या घटनेवेळी पोपटही भाजला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. आता ३ आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्म ठेपेची शिक्षा ठोठावली आहे. घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर पसरले असून राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेला जवळपास ११ वर्षे होत आली असून आता आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

झाले भगवतीच्या मूळ रूपाचं दर्शन,सप्तश्रृंगी देवीची मूर्ती संवर्धन व देखभालीचे काम पूर्ण