राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांच्या संपत्तीवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे. माजी मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसऱ्या मोठ्या नेत्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.
इक्बाल मिर्ची प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली. वरळी येथील प्लॉट खरेदी दरम्यान आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावर आहे. या कारवाईत ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांच्या वरळी येथील घरावर निर्बंध लावण्यात आले. हा फ्लॅट पटेल कुटुंबीय वापरू शकतील, पण त्याची विक्री करू शकणार नाहीत.