Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रस्त्यावर थुंकाल तर होईल कारवाई

BMC
, सोमवार, 11 मार्च 2024 (09:26 IST)
मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा क्लीन मार्शल नेमण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मुंबईत महापालिकेने थुंकणाऱ्यांवर आणि रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी क्लीनअप मार्शलची नेमणूक केली होती. परंतु, काही काळानंतर ही कारवाई थांबवण्यात आली. परंतु आता ही कारवाई पुन्हा सुरू होत असून उघड्यावर घाण, कचरा फेकणाऱ्यांवर ‘क्लीनअप’ मार्शलची नजर असणार आहे. महापालिकेच्या वॉर्डात ‘क्लीनअप मार्शल’ची नियुक्ती केली आहे. रस्त्यावर थुंकणे, घाण फेकणे, कचरा फेकणाऱ्यांवर क्लीनअप मार्शल २०० रुपये ते एक हजारांपर्यंत दंड वसूल करणार आहेत.

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि डेब्रिज फेकण्यास मनाई असताना काही लोकांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांवर पुन्हा क्लीनअप मार्शल नेमण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान 24 वॉर्डामध्ये टप्प्याटप्प्यात 720 क्लीनअप मार्शलची नियुक्ती होणार असून शहर गलिच्छ करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. त्यानुसार, रस्त्यावर थुंकणे, कचरा फेकणारे तसेच घाण करणाऱ्यांवर आता क्लीनअप मार्शल 200 ते एक हजार रुपये दंड आकारले जाणार आहेत.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक : शरीरसुखासाठी भाच्यानेच घेतला मामीचा जीव; २४ तासांत उलगडा !