Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हरी नरकेंना पु.ल .देशपांडेंनी लग्नावेळी दिला होता 'हा' कानमंत्र

hari narke
, बुधवार, 9 ऑगस्ट 2023 (20:48 IST)
ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचं निधन झालं आहे. मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराने त्यांचं निधन झालं. ते 60 वर्षांचे होते. विचारवंत, लेखक, मालिका निर्माते, ब्लॉगर म्हणून ते महाराष्ट्राला परिचित होते
हरी रामचंद्र नरके यांचा जन्म 1 जून 1963 साली झाला.ते एक मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर म्हणून त्याची ओळख होती.
 
पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं . महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य होते.
 
हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे.
 
महात्मा फुले हा त्यांच्या अभ्यासाचा मुख्य विषय होता पण त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळी हाही त्यांचा अभ्यासाचा विषय राहिलेला आहे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य सोबतच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फोटो बायोग्राफी सुद्धा संपादित केली आहे.
 
हिंदी, मराठी इंग्रजी भाषेत त्यांचे 37 ग्रंथ प्रकाशित झाले होते. महात्मा फुले साहित्याच्या हिंदी आणि इंग्रजी अनुवादांच्या खंडाचे ते संपादक होतो. 60 विद्यापाठातील चर्चामध्ये त्यांनी शोधनिबंध सादर केले होते. विविध वर्तमानपत्र, वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून 100 पेक्षा अधिक लेख प्रकाशित झाले होते.
 
काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर ह्रदय शस्त्रक्रिया झाली होती असं समजत आहे आज ते पुण्याहून मुंबईकडे निघालेले असताना त्यांना गाडीत त्रास सुरू झाला मग एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मध्ये त्यांना नेण्यात आलं तिथेच त्यांचं निधन झालं
 
“हरी नरके यांनी बाबासाहेब आंबेडकरांची फोटोग्राफी प्रसिद्ध केली. त्यांनी छान पुस्तकं तयार केली. महात्मा फुल्याचं मूळ चित्र शोधून काढलं, आमच्या प्रत्येक कार्यक्रमात, हरी नरके आमचा वैचारिक पाठिंबा होता. अलीकडे आरक्षणाच्या बाबतीत ते माहिती पुरवायचे. बोलण्याच्या पलीकडे आहे हे सगळीकडे.” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
 
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही नरके यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणतात, “समता चळवळीचे आघाडीचे शिलेदार,ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक श्री.हरी नरके यांचे दुर्दैवी निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे.
 
त्यांच्या अकाली जाण्याने बहुजन चळवळीचे अपरिमित नुकसान झालं आहे.नरके कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नरके यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणतात, “मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर प्रो. हरी रामचंद्र नरके यांचे दुःखद निधन झाले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपण गमावले.
 
हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू या प्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले.
 
हरी नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विषय ज्वलंत उदाहरणे आहेत. जसे, ओबीसींमध्ये पेरली दुहीची बीजे, फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन, मराठा आरक्षण, महात्मा फुले, समाजशोध इत्यादी. त्याप्रमाणेच त्यांची पुस्तके, महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन, महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा असे अनेक पुस्तके प्रकाशित झाली.”
 
पुलंनी लग्नाबद्दल दिला होता हा कानमंत्र
हरी नरके यांनी त्यांच्या लग्नाच्या गोष्टीचा किस्सा महाराष्ट्र टाइम्स मध्ये प्रकाशित झाला होता., “'आंतरजातीय विवाह करतोय,' असे नरके यांनी घरी सांगितल्यानंतर प्रचंड विरोध होऊ लागला. 'जातिबाहेरच्याच मुलीशी लग्न करेन, नाहीतर अविवाहित राहीन,' हा निर्धार कायम असल्याचे बघून आईने माझ्यासाठी जातिबाहेरची एक मुलगी पसंत केली. मी अतितत्काळ, अगदी निमूटपणे होकार दिला. मी या बाबतीत आत्यंतिक आज्ञाधारक मुलगा होतो. 'मी तुझ्या शब्दाबाहेर नाही, तू म्हणशील तिच्याशी मी लग्न करतो,' असे मी म्हटल्यावर ती एकदम खूष झाली. मीही खूष होतो; कारण आईची आणि माझी पसंत एकच होती. अर्थात, हा केवळ योगायोग नव्हता, तर त्यामागे काही वर्षांची मेहनत होती. चिकाटी आणि विश्वास होता...'
 
'लग्न खर्चिक असू नये. सत्यशोधक पद्धतीने लग्न करून त्याची नोंदणी करायची, असा निर्णय झाला होता. प्रख्यात चित्रकार आणि सन्मित्र संजय पवार यांनी एक कलात्मक डिझाइन असलेली निमंत्रणपत्रिका तयार केली. मी आणि संगीता १ मे १९८६ ला आंतरजातीय विवाह करतोय. शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला तुम्ही आप्तेष्ट, मित्रांनी नक्की यावे, असा त्यात मजकूर होता. लग्न अजिबात खर्चिक असू नये; पण ठरवून आंतरजातीय करतोय, तर गुपचूप किंवा पळून जाऊन केले, असे होऊ नये; म्हणून मोजक्या मित्र, नातेवाईकांच्या उपस्थितीत ते करावे, असे ठरवले होते
 
मी भाईंकडे (पु. ल. देशपांडे) गेलो. त्यांना माझी अडचण सांगितली. ते म्हणाले, 'हरी, तू अजिबात काळजी करू नकोस. लग्न ही एरंडेल पिऊन स्मशानात करायची गोष्ट नाही. तो आयुष्यातला आनंदसोहळा असतो. तो खर्चिक असू नये, हे ठीक आहे; पण आलेल्यांना तुला जेवण द्यायचेय, तर अवश्य दे. एक तर आपण पुणेकर आधीच आदरातिथ्यासाठी 'जगप्रसिद्ध' आहोत. त्यात आणखी भर नको. मी व्यवस्था बघतो. पुण्याच्या हॉटेल श्रेयसच्या अंबर सभागृहात विवाह नोंदणी आणि स्वागत समारंभ एकत्रित पार पडला.'
 
श्रद्धांजलीचा ओघ
ज्येष्ठ लेखक संजय सोनावणी यांनीही आपला हसता खेळता बंधू गेल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 22 जून 2023 च्या व्हॉट्सअप मेसेजचा संदर्भ त्यांनी दिला. हृदय आणि किडनी विकाराने ग्रस्त असल्याने ते फार त्रासले होते. माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत असं ते म्हणाले.
 
ज्येष्ठ निर्माते आणि पत्रकार नितीन वैद्य म्हणाले, “प्रा. हरी नरके गेले हे अत्यंत दुःखद आहे. दहा दिवसांपूर्वीच माझ्याकडे आले होते. प्रकृती बरी नाही हे दिसत होते. माझ्या डॉ आंबेडकरांवरील मालिकेसाठी संशोधन सल्लागार म्हणुन त्यांनी कामही केले होते. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे उपाध्यक्ष होते. या संस्थेच्या भवितव्याबाबत चिंतित होते. महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबाबतीतला चालताबोलता ज्ञानकोश होते. प्रा. नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”
 
ज्येष्ठ लेखक सदानंद मोरे यांनीही बीबीसी मराठीशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली. “हरी नरके हे माझे जुने मित्र होते. कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊन अभ्यास करायचा हा त्यांचा ध्यास होता. सामाजिक समतेचं एक झपाटलेपण त्यांच्यात होतं. वैयक्तिक, संस्थात्मक शासकीय पातळीवर आधारित असणारं होतं. ते प्रचारकी असता कामा नये अशी त्यांची धारणा होती. असे मार्गदर्शक लाभले. त्यातून त्यांनी य.दि. फडक्यांना मदत केली. फुले साहित्याच्या प्रकाशनात त्यांचा मोठा वाटा होता.”
 








Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमित शाह : मणिपूरमध्ये आतापर्यंत 152 लोकांचा मृत्यू, या प्रकरणाचं राजकारण नको