आपण अशा महामारीतून जात आहोत की जेव्हा कुणी आप्तस्वकीयाचं निधन झालं तर त्यांचे अंत्यसंस्कार करणंही दुरापास्त झालंय. पार्थिव थेट स्मशानभूमीत जातं आणि तिथलेच कर्मचारी पार्थिवावर अंत्यसंस्कार करतात. निडरतेने आणि आपुलकीनेही.
आज सर्व कोव्हीड योद्धांचा सत्कार होतो, जो व्हायलाच हवा. पण असाही एक घटक आहे जो नियतीच्या क्रूर खेळालाही माणुसकीच्या ओलाव्याने निष्क्रिय करतो. तो म्हणजे कोव्हीड पार्थिवांवर अंत्यसंस्कार करणारा स्मशान कर्मचारी.
रत्नागिरीतील महाराष्ट्र सैनिकांनी ह्याच दुर्लक्षित योद्ध्यांचा सन्मान करायचं ठरवलं. मनसे नेते अमित ठाकरे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर येथील महाराष्ट्र सैनिकांनी ह्या स्मशान कर्मचाऱ्यांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं, त्यांचा गौरव केला. ह्या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल महाराष्ट्र सैनिकांचं विशेष कौतुक.