Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 23 April 2025
webdunia

'बडबोले लेकाचे' अग्रलेखातून भाजपला टोला

Agralekh to Samna
, शनिवार, 21 सप्टेंबर 2019 (15:44 IST)
नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराबाबत शिवसेनेला टोला मारला होता. त्यानंतर आता 'सामना'त 'बडबोले लेकाचे' असा अग्रलेख लिहून पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.   
 
राम मंदिरच्या मुद्यावरुन भाजपने शिवसेनेचा चांगला समाचार घेतला. गेले काही दिवस काही वाचाळवीर उलटसुलट वक्तव्ये करून यामध्ये अडथळा निर्माण करत आहेत, असे थेट मोदी म्हणाले होते. परंतु शिवसेनेने आपल्या सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधला आहे. राममंदिराचा विषय न्यायालयात आहे हे खरे, पण राममंदिर या विषयावर हवे तसे बोलणारे वाचाळवीर भाजपमध्येच आहेत. त्यामुळे पंतप्रधानांची नाशकातील चिडचिड समजून घेतली पाहिजे, असे टोकले आहे.
 
बडबोलेपणामुळे पंतप्रधानांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर भाजप नेत्यांनी राममंदिरावर बोलणे टाळले पाहिजे. भाजपच्या नेत्यांनी पंतप्रधानांची सूचना मान्य करून तोंडास कुलुपे घातली तर राममंदिराचा निर्णय लागलाच म्हणून समजा. पंतप्रधानांचीच तशी इच्छा आहे, असे अग्रलेखात नमुद करत शिवसेनेने भाजपलाच टोला लगावला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डिलिट फॉर ऑल केल्यानंतर देखील वॉट्सऐप मीडिया फाइल्स ऍक्सेस करू शकतात आयफोन यूजर्स