Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अहमदनगर ब्रेकींग: गर्भपाताच्या गोळ्या जप्त प्रकरण; ‘त्या’ मेडिकल एजन्सीचा परवाना रद्द

medicine
, शनिवार, 14 मे 2022 (08:52 IST)
गर्भपाताच्या गोळ्या प्रकरणी श्रीराम एजन्सीचा परवाना शुक्रवार पासून रद्द करण्यात आला आहे. औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त हेमंत मेतकर यांनी याबाबत आदेश काढले आहे.
 
5 मे रोजी एमआयडीसी पोलीस व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी टाकलेल्या छाप्यात गर्भपातासाठी दिल्या जाणार्‍या गोळ्यांची पाकिटे जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी सावेडी येथील श्रीराम एजन्सीचे मालक नितीन जगन्नाथ बोठे, याच्यासह हरियाणा येथील औषध निर्मिती कंपनी आयव्हीए हेल्थकेअरच्या सर्व संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दरम्यान औषध प्रशासनाने दोन दिवसापूर्वी बोठे याला नोटीस देऊन, आपल्या मेडिकल एजन्सीचा परवाना का रद्द करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा करावा, अशी नोटीस दिली होती. यानंतर श्रीराम मेडिकल एजन्सीचा परवाना रद्द करण्यात आला आहे. परवाना रद्द करण्याबाबतचा आदेश सहायक आयुक्त मेतकर यांनी शुक्रवारी काढला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ ! बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेलाच त्यांनी हरताळ फासला…-राधाकृष्ण विखे पाटील