Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मालेगावात दोन कोरोना रुग्ण आढळले

corona
शुक्रवार, 13 मे 2022 (21:35 IST)
नाशिक जिल्ह्यात सुरुवातीला कोरोनाचा उद्रेक झाला. सोबतच तो मालेगावातून हद्दपारी झाला.  गेल्या अनेक दिवसांपासून एक रुग्णही आढळून येत नसलेल्या मालेगाव महापालिकेत शुक्रवारी कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 
प्रशासनाकडून आलेल्या आकडेवारीनुसार, मालेगाव शहरात दोन कोरोनाबाधित रुग्णआढळून आले आहेत. तर जिल्हाबाह्य एक रुग्ण आणि नाशिक शहरात  एक बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात करोनाचे अचानक चार रुग्ण आढळल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे.
 
एकीकडे रुग्णसंख्या शून्याकडे वाटचाल करत असतानाच अचानक चार रुग्ण आढळल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. लसीकरणाकडे अनेकांनी पाठ फिरवलेली आहे, दुसरीकडे बुस्टर डोस घेणाऱ्यांची संख्यादेखील बोटावर मोजण्याइतकी आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात ही आपत्ती संकटात आणू नये म्हणून प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पतीचा गळा दाबून जीवे ठार मारण्याचा तर पत्नीचा…विनयभंग करण्याचा प्रयत्न