Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अहमदनगर ब्रेकींग: युवक-युवती देवदर्शनाला गेले अन्…

अहमदनगर ब्रेकींग: युवक-युवती देवदर्शनाला गेले अन्…
, मंगळवार, 4 जानेवारी 2022 (21:26 IST)
अगडगाव (ता. नगर) येथील कानिफनाथाच्या दर्शनासाठी गेलेल्या युवक-युवतीला दमदाटी करून व दगडाने मारहाण करत लुटल्याची घटना घडली. या मारहाणीत संबंधीत युवक-युवती जखमी झाले आहेत. युवतीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
बुरूडगाव (ता. नगर) येथील राहणारे युवक-युवती अगडगाव येथील कानिफनाथाच्या दर्शनासाठी गेले होते.दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरात थांबलेले असताना तेथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने त्यांना दमदाटी करत दगडाने मारहाण केली.
युवतीच्या हातातील अंगठी, कानातील रिंगा काढून घेतल्या. तसेच त्यांच्या दुचाकीवर दगड टाकून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, एलसीबीचे निरीक्षक अनिल कटके, भिंगारचे पोलीस उपनिरीक्षक बेंडकोळी यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास उपनिरीक्षक बेंडकोळी करीत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – २०२१ साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन