Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजित पवार यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर वाशिम येथील गायरान जमिनीवरुन आरोप केले

ajit pawar
, सोमवार, 26 डिसेंबर 2022 (20:55 IST)
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन खासगी व्यक्तीला देण्याचा आरोप केला आहे. यावरुन आता विरोधकांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
 
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर वाशिम येथील गायरान जमिनीवरुन आरोप केले, तर सत्तार यांच्या राजिनाम्याची मागणीही केली. काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही आरोप करत राजिनाम्याची मागणी केली. विरोधकांनी यावरुन सभागृहात गोंधळ केला. 
 
मंत्री सत्तारांविरुद्ध फौजदारी दाखल करा, माजी गृहमंत्र्यांची विधानसभेत मागणी
 
गायरान जमिनिवरुन हायकोर्टानेही अब्दुल सत्तार यांच्यावर ताशेरे ओढले असल्याचे अजित पवार म्हणाले. विरोधकांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजिनाम्याची मागणी केली. 
 
'या जमिनीची किंमत 150 कोटी रुपये आहे. यात मंत्री महादयांनी पदाचा दुरुपयोग केला आहे. एका व्यक्तीला फायदा मिळवून देण्यासाठी हे सर्व केल आहे, त्यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय समोर असताना त्यांनी हे सर्व केले आहे. त्यांनी जबाबदारी स्विकारुन आपल्या पदाचा राजिनामा दिला पाहिजे, राजिनामा दिला नाहीतर त्यांची मुख्यमंत्र्यांनी हक्कालपट्टी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.   
 
नेमकं प्रकरण काय?
 
वाशिम जिल्ह्यातील 37.19 एकर जमिनीचे अवैध वाटप केल्याचा आरोप मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात आला आहे. गायरानाची जमीन एका खासगी व्यक्तीच्या नावे नियमित केल्याचा आरोप आहे. 
 
17 जून 2022 रोजी ही जमिन ताब्यात दिली. या संदर्भात उच्च न्यायालयाने नोटीस बजावली. यावरुन आता अधिवेशनात विरोधकांनी राजिनाम्याची मागणी केली आहे. नागपुरात विधान भवन परिसरात अब्दुल सत्तार उपस्थित नसल्याचे समोर आले आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईतील अतिधोकादायक इमारतींना स्वयंपुनर्विकास करण्याची परवानगी देणार