विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अशब्द वापरल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांची कानउघडणी केली असल्याची चर्चा आहे. जयंत पाटील यांचं निलंबन झालं, त्यावेळी तुम्ही आवाज उठवण्याऐवजी तुमची भूमिका मवाळ होती. अशा शब्दात शरद पवार यांनी अजित पवारांना सुनावले असल्याची चर्चा आहे. त्यावर अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असताना अजित पवार हे पत्रकारांवर चांगलेच संतापले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अपशब्द वापरल्याने त्यांचं अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आलं. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्रमक भूमिका न घेतल्याने, भाजपचे काम सोपे झाल्याचा आरोप अजित पवार यांच्यावर झाला. तसेच अजित पवार यांच्या मवाळ भूमिकेवर शरद पवार यांनी त्यांची शाळा घेतल्याची चर्चा होती.
गेली ३२ मी राजकारण-समाजकारणात वावरतो आहे. मला काय दुधखुळा समजला काय? विरोधी पक्षनेते म्हणून माझं काम मी कसं करावं, हे मला कुणी सांगण्याची गरज नाही. मला विरोधी पक्षनेतेपदावर बसवलेल्या आमदारांना माझं काम माहिती आहे, त्याचमुळे तर त्यांनी मला त्या पदावर बसवलं. बरं माझ्यावर पवारसाहेब नाराज झाले, हे तुम्हाला कोणी सांगितलं, पवारसाहेबांनी तुम्हाला फोन केला होता का? असे एकामागून एक सवाल करत कंड्या पिकवण्याचं काम करु नका, अशा शब्दात अजित पवार यांनी पत्रकाराला खडसावलं.
Edited By- Ratnadeep Ranshoor