Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजित पवार गटाने ठाणे रुग्णालयातील घटनेवरून कुरघोडी करू नये

ramdas adthavale
, मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (21:35 IST)
मुंबई – एकनाथ शिंदे सरकारमध्ये नुकत्याच सामील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामुळे अस्वस्थता निर्माण झाल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येतो आहे. त्यातच ठाण्यातील रुग्णालयात झालेल्या मृत्यूप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट विचारणा केल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याची चर्चा होती. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया आली आहे.
 
रामदास आठवले म्हणाले की, अजित पवार उपमुख्यमंत्री झाले तरी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, हे भाजपने स्पष्ट केले आहे. तसेच अजित पवार गटाने ठाणे रुग्णालयावरून एकमेकांवर कुरघोडी करू नये.
 
भाजपने पक्ष फोडले, भाजपने सरकार पाडले यात काही तथ्य नाही. शरद पवार यांनी राष्ट्रहितासाठी एनडीएसोबत यायला हवे. मी देखील काँग्रेस, एनसीपी सोबत राहून पुन्हा एनडीएमध्ये आलेलो आहे. त्यामुळे पवारांनी राहुल गांधींच्या नादाला लागू नये, असा सल्लाही आठवले यांनी दिला.
 
कांदा निर्यात शुल्कावर आठवले म्हणाले की, केंद्र सरकार शेतक-यांच्या बाजूने आहे. अनेक दिवसांची मागणी आहे. कांद्याला चांगला भाव मिळावा. आपल्या कवितेतून आठवले यांनी म्हटले की, ‘महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पिकत आहे कांदा आणि महाविकास आघाडीचा झाला आहे वांदा.’
===========================
4. बुलेटच्या चाकात ओढणी अडकल्याने महिलेचा मृत्यू
 
वसई  :- पती-पत्नी देवदर्शनाहून घरी निघाले असताना चाकात ओढणी अडकून पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पत्नीच्या निधनामुळे पतीवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईहून पती-पत्नी आपल्या मनातली इच्छा घेऊन तुंगारेश्वर येथील महादेवाच्या दर्शनासाठी गेलेे होते.  देवदर्शन झाल्यावर दोघेही पून्हा घराच्या दिशेने निघाले होते.
 
पती आणि पत्नी दोघेही बुलेटवरुन घरी जात होते. यावेळी पत्नीची ओढणी दुचाकीच्या मागच्या चाकात अडकली. ओढणी चाकात अडकल्याने पत्नीला गळफास बसला आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात पत्नीच्या डोक्याला जोरात मार लागल्यानेे तिचा जागीच मृत्यू झाला.
 
प्रतिमा यादव (वय 27, रा. इराणवाडी, कांदिवली पश्चिम) असे मृत महिलेचे नाव आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई बाफाणे हद्दीत ही घटना घडली. पत्नीचा जीव वाचावा म्हणून पतीने तातडीने तिला रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत बराच उशिर झाला होता. अपघातात पत्नीने पती समोरच जीव सोडला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निर्णय एकच नेते 4 आणि घोषणा 3 वेळा, शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये ‘मिसकम्युनिकेशन’ की श्रेयवाद?