Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजित पवारांनी एमपीएससीला खडे बोल सूनावले

अजित पवारांनी एमपीएससीला खडे बोल सूनावले
, शुक्रवार, 12 मार्च 2021 (16:43 IST)
राज्य लोकसेवा आयोगाची ( MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रीया देत असताना त्यांनी एमपीएससीला खडे बोल सूनावले आहे.
 
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात लोकप्रतिनिधींची आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी  त्यांनी पुण्यात लॉकडाऊन नाही, परंतु निर्बंध  काटेकोरपणे लागू केले जातील असे सांगितले.
 
एमपीएससीच्या प्रश्नावर बोलताना पवार म्हटले की, ' MPSC च्या परीक्षांबाबत विनाकारण राजकारण तापवण्याचं काम करण्यात आलं. परंतु आता सुधारीत वेळापत्रक आयोगाने जारी केलं आहे. त्यानुसार परीक्षा होतीलच. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याप्रकरणात स्वतःहून लक्ष घालत आहे.'
 
'परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याबाबत माझं स्पष्ट मत आहे की, हे प्रकरण हातळण्यात एमपीएससी कमी पडले आहे. एमपीएससी स्वायत्त संस्था असली तरी त्यांनी विद्यार्थ्यांना अडचणीत आणणारे निर्णय घेऊ नये', अशा कडक शब्दात अजित पवार यांनी एमपीएससीचे कान उपटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पश्चिम बंगाल निवडणुकीविषयी भाजपला एवढा आत्मविश्वास का वाटतो?