राज्यात घरगुती आणि कृषी अशा दोन्ही ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्याचे सत्र राज्यात सुरू आहे. अनेक ठिकाणी छोट्या दुकानदारांना बिल भरता आलीच नाही. त्यामुळे खूप मोठी अडचणी निर्माण झाली आहे. पैसे मिळालेच नाहीत तर वीजबिल कुठून भरणार असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे वाढीव वीजबिलाच्या प्रश्नावर सरकारने चर्चा सुरू करावी. त्यावर विधानसभेत तातडीने चर्चा करण्याचा प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. त्यावर अजितदादा यांनी या विषयावर विधानसभेत चर्चा होणार नाही तोवर कोणत्याही घरगुती किंवा कृषी वीज ग्राहकाची वीज तोडण्यात येणार नाही असे आश्वासन दिले.
या विषयावर सत्तारूढ पक्षाचा प्रस्तावातच चर्चा करावी असा सल्ला विधानसभेच्या उपाध्यक्षांनी दिला. पण राज्य सरकारचा प्रस्ताव हा कोरोनाशी संबंधित आहे. त्यामुळेच या विषयावर स्वतंत्र चर्चा व्हावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यात दर मिनिटाला कनेक्शन कापले जात आहेत. म्हणूनच तातडीची चर्चा करण्यासाठी भाजपने मागणी केली. खूप मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांना भूर्दंड बसत आहे. अशा परिस्थितीत कनेक्शन तोडणार नाही अशी ग्वाही देण्याची सरकारकडे मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली
दुसरीकडे अजितदादांच्या या निर्णयाचे स्वागत देवेंद्र फडणवीस यांनी केले आणि त्यांचे आभारही मानले.