Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कर्नाटकाकडून झालेल्या मागणीला अजित पवार यांचे प्रत्युत्तर

कर्नाटकाकडून झालेल्या मागणीला अजित पवार यांचे प्रत्युत्तर
, गुरूवार, 28 जानेवारी 2021 (16:55 IST)
“केवळ राज्य प्रमुख या नात्याने कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईबाबत वक्तव्य केलं असून, त्याला कोणताही आधार नाही. हा वाद अनेक वर्षाचा आहे. कर्नाटकचा मुंबईशी संबंधच येत नाही असे कर्नाटकाकडून झालेल्या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 
 
कर्नाटकातील जनतेला खूश करण्यासाठी तेथील उपमुख्यमंत्र्यांनी हा तर्क लावला आहे. बेळगावमध्ये मराठी भाषिक आमदार आणि महापौर निवडून यायचे. तिथल्या बहुसंख्य नागरिकांची मागणीही महाराष्ट्रात येण्याची आहे. नंतर कर्नाटक सरकारने यामध्ये फेरफार केला आणि बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला. फेररचना करून मराठी भाषिक गाव कानडी भाषिक गावांमध्ये सामील केली,” असं सांगत पवार यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजप वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख, गृहमंत्री अनिल देशमुखांनी घेतली दखल