अकोल्यात शनिवारी संध्याकाळी दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची बातमी समोर आली आहे. जुने शहर पोलीस स्टेशन परिसरात हा हिंसाचार झाला. या हिंसाचाराचा एक व्हिडिओही समोर आला असून त्यात दोन्ही गट एकमेकांवर दगडफेक करत वाहनांचे नुकसान करत असल्याचे दिसून येत आहे. दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी कलम 144 लागू केले.या प्रकरणी 26 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. काही समाज कंटकांनी एका घराला पेटवले आहे. या हिंसाचारात एक महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह चार जण जखमी झाले आहे.
अकोलाचे एसपी संदीप घुगे यांनी सांगितले की, छोट्या वादातून हा हिंसाचार झाला. या काळात संतप्त जमावाने अनेक वाहनांचे नुकसान केले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. एका सोशल मीडियावर आलेल्या पोस्टमुळे हा वाद झाला आणि अनेक लोक रस्त्यावर उतरून दगडफेक करू लागले. अनेक वाहनांचे नुकसान केले जाळपोळ केली. तणावाची स्थिती झाली. अकोल्याच्या डीएम नीमा अरोरा यांनी सांगितले की, हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.सध्या स्थिती नियंत्रणात असून परिसरात पोलिसांची नजर आहे.इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.