Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंबोली घाटात दरड कोसळली

आंबोली घाटात दरड कोसळली
, शुक्रवार, 23 जुलै 2021 (12:11 IST)
आंबोली घाटामध्ये शुक्रवारी रात्री मुख्य धबधबा पासून अर्धा किलोमीटर पुढे दरड कोसळली. त्यामुळे घाट रस्ता पूर्णपणे वाहतुकीस ठप्प झाला. त्काळ वाहतूक थांबवली यानंतर सकाळी सात वाजताच्या सुमारास आंबोली पूर्वीचा वस येथेसुद्धा भली मोठी दरड कोसळली. त्यामुळे आंबोली घाटात दोन ठिकाणी दरडी कोसळल्याने रस्ता पूर्णपणे वाहतुकीस पूर्णपणे ठप्प झाला.
 
आंबोली पोलीस प्रशासनाकडून बांधकाम विभागाला वारंवार याबाबत माहिती देण्यात आली होती. बांधकाम विभागाच्या वेळकाढूपणामुळे दरड हटविण्यात उशीर होत असून दुपारचे दोन वाजतील असे सांगण्यात आले आहे. दरड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरू होईल. दरड बाजू करण्यास दुपारी 2 वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
तसेच पाणी आल्याने पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्ग ठप्प. तर कोल्हापूर जिल्ह्याची पूरस्थिती गंभीर रूप घेतीय. पुणे-बेंगलोर महामार्गालगत असणार्‍या नद्यांची पाणी पातळी वाढल्याने महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टोकियो ऑलिम्पिक 2020: आयओएने जाहीर केले की,ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूला 75 लाख रुपये मिळतील