मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या (एनजीएमए) कार्यक्रमात चालू भाषणावर आक्षेप घेत बोलू न दिल्याबद्दल अमोल पालेकर यांनी नाराजी व्यक्त केली.
मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या (एनजीएमए) कार्यक्रमात चालू भाषणात तुम्ही हे बोलू नका असे सांगून अनेक अडथळे आणले गेले, औचित्यभंगाचे कारण पुढे करुन मला भाषण करु दिले नाही. एखाद्या वक्तव्याने काय बोलावे काय नाही, याची माहिती त्याला आधी द्यायची असते, मात्र मला तसे सांगण्यात आले नव्हते. मात्र, एनजीएमएमधील कार्यक्रमात या संस्थेत झालेल्या बदलांवर बोलणे हे औचित्यभंग कसे असू शकते? असा सवाल उपस्थित करीत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी नाराजी व्यक्त केली. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संध्या गोखले या देखील उपस्थित होत्या.
एनजीएमए येथे भाषण करताना सरकारच्या सांस्कृतिक आणि कलाविषयक धोरणांवर टीका केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचे भाषण मध्येच थांबवण्यात आले होते. त्यामुळे कलाविश्वासोबतच विविध क्षेत्रातून कार्यक्रमाच्या आयोजकांवर टीका होऊ लागली आहे. सुप्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नॅशलन गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रुखम पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी, आर्ट गॅलरीने आपले स्वातंत्र्य कसे गमावले, याबद्दल पालेकर बोलत होते.
पालेकर म्हणाले, एनजीएमए नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये प्रभाकर बर्वे या आंतराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकाराच्या कलेला उजाळा देण्याचे काम सुरु होते. तिथे मला वक्ता म्हणून बोलावण्यात आले होते. यावेळी हा कार्यक्रम बर्वेंसंदर्भात असल्याने त्यावरच बोलावे सरकारवर टीका करु नये, असे मला कार्यक्रमाच्या प्रुखांकडून सांगत औचित्याचा मुद्दा उपस्थित करुन माझ्या भाषणात अनेकदा अडथळे आणले गेले. ही संस्था आणि त्यामध्ये आता झालेले बदल यावर मी बोलण हे औचित्यभंग कसे आहे हे मला कळत नाही. त्यामुळे या मंचावरुन हे बोलू नये, असे सांगणे हे चुकीचे आहे.