पिंपरी-चिंचवड येथे पुनरुत्थान समरस्ता गुरुकुलमतर्फे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीयवादावरुन तो पसरवणाऱ्यांचा जोरदार टीका केली असून त्यांना कडक शब्दात सुनावले आहे. गडकरी म्हणाले की जातीचं नाव जो काढेल त्याला मी ठोकून काढणार आहे, आमच्या पाच जिल्ह्यात जात कोणीही काढत नाहीत. त्यामुळे जातीयवाद आणि संप्रदायिकतेपासून मुक्त आर्थिक, सामाजिक समता-एकता याच्या आधारावर संपूर्ण समाजाचे संघटन झाले पाहिजे असे कडक शब्दात त्यांनी स्नुनावले आहे. यावेळी महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, आमदार लक्ष्मण जगताप, माधव भंडारी गिरीश प्रभुणे, खासदार अनिल शिरोळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
गडकरी पुढे म्हणाले की, आमच्या इथे एखाद्याची जात काढण्याचे प्रकार पूर्ण बंद झालय, कारण मी स्वतः सर्वांना तस बजावलंच आहे. जो जातीचं नाव काढेल त्याला मी ठोकून काढणार आहे. समाजात गरीब श्रीमंत असता काम नये, कोणी छोट्या आणि मोठ्या जातीचा राहता कामा नये. आपला समाज एकात्मता आणि अखंडतेच्या आधारावर तयार झाला पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट मत यक्त केले आहे.