Publish Date: Sat, 29 Jan 2022 (22:03 IST)
Updated Date: Sat, 29 Jan 2022 (22:06 IST)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत टीका केली आहे. त्यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केलं आहे. प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात केलेल्या या ट्विटमध्ये नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हे पटोले या जमाती एकत्र कुठे पाहिल्या जाऊ शकतात, असा सवाल केला आहे.
'गाळलेल्या जागा भरा' अशा स्वरुपात दुसरा प्रश्न विचारत आघाडीच्या नेत्यांची काही वाक्यं वापरली आहेत. या ट्विटमध्ये अमृता फडणवीसांनी कुणाची नावं लिहिली नसली तरी त्यांचा रोख हा महाविकास आघाडीचे नेते आणि नजिकच्या काळातील काही नेत्यांची वादग्रस्त विधानं याकडे असल्याचं उघड आहे. नेहमीच वेगवेगळ्या मुद्दावरून अमृता फडणीस हे गेले काही दिवस हा विकास आघाडीतील नेत्यांवर टीका करत आहेत. त्यांनी टीका करताना कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या या वक्तव्यानं चांगली खळबळ उडाली आहे.