Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अण्णा हजारे अत्यंत अविश्वासू आणि ‘मॅनेज’ होणारे समाजसेवक : मुणगेकर

अण्णा हजारे अत्यंत अविश्वासू आणि ‘मॅनेज’ होणारे समाजसेवक : मुणगेकर
, सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (08:13 IST)
अण्णा हजारे हे अत्यंत अविश्वासू आणि ‘मॅनेज’ होणारे समाजसेवक आहेत. ते राजकीयदृष्ट्या हास्यास्पद व्यक्तिमत्व ठरले आहेत. त्यांनी २०११ साली केलेल्या आंदोलनामागील बोलवते धनी कोण होते, हे उघड झाले आहे. हजारे म्हणजे महात्मा गांधी नव्हेत अशी कडवट टीका नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.
 
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. भाजपा नेत्यांच्या शिष्ठाई नंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.  यावर मुणगेकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यांच्या अभ्यासासाठी समिती नेमलेली असताना हजारे यांनी उच्चस्तरीय समिती गठित करण्याच्या अटीवर उपोषण मागे घेतले. ही बाब हास्यास्पद आहे. त्यांनी २०११ साली केलेले आंदोलन हे पूर्णपणे नियोजित होते. त्यांच्या आंदोलनामागे नेमके कोण होते, त्यांचा बोलविता धनी कोण होता, हे आता समोर आले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लोहगाव विमानतळ १४ दिवस बंद राहणार