Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 28 March 2025
webdunia

आणखीन एक ते दोन दिवस राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामान

आणखीन एक ते दोन दिवस राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामान
, सोमवार, 14 डिसेंबर 2020 (11:36 IST)
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ऐन थंडीच्या हंगामात ढगाळ वातावरण आणि पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. रविवारी मुंबई परिसरासह कोकण विभागांत तुरळक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही भागांत हलक्या पावसाने हजेरी लावली. आणखी एक ते दोन दिवस राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामानाची स्थिती राहण्याची शक्यता आहे.
 
अरबी समुद्रातील घडामोडींमुळे  सोमवारी  मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

COVID-19 in America : अमेरिकेत Coronaमुळे आतापर्यंत 3 लाख लोक मरण पावले, 1 कोटीपेक्षाहून अधिक संक्रमित