Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

बाजार समिती आवारात विना मास्क आढळून आलेल्या ३२ शेतकरी व कामगारांची ॲन्टीजेन टेस्ट

Antigen test of 32 farmers and workers found without mask in the market committee premises Maharashtra News Regional Marthi news
, बुधवार, 14 जुलै 2021 (08:02 IST)
कोरोनाचा प्रादुर्भाव निफाड तालुक्यात काही प्रमाणात स्पष्ट जाणवत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणुन गर्दीचे केंद्र असलेल्या लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार आवारास आज सहाय्यक निबंधक अभिजीत देशपांडे यांनी सचिव नरेंद्र वाढवणे यांचेसह अचानक भेट देऊन पहाणी केली. यावेळी आवारात विना मास्क आढळुन आलेल्या ३२ शेतकरी व कामगारांची ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आली.

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लासलगांव येथे कोरोना आढावा बैठकीत दररोज बाजार समितीत आलेल्या घटकांची नियमितपणे ॲन्टीजेन टेस्ट, ऑक्सीजन व तापमान तपासणी आणि सॅनीटायझेशन करण्याबाबत अधिका-यांना सुचना दिल्या होत्या.

त्यानुसार निफाडचे सहाय्यक निबंधक अभिजीत देशपांडे यांनी लासलगांव मुख्य बाजार आवारात फळे व भाजीपाला लिलावाची पहाणी करून लासलगांव मुख्य, निफाड व विंचुर उपबाजार आवारावर तसेच खानगांव नजिक तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर जे शेतकरी बांधव व इतर मार्केट घटक विना मास्क येतील तसेच त्यांचे जवळ सॅनीटाझर नसेल अशा इसमांची तात्काळ ॲन्टीजेन टेस्ट करून पॉजीटिव्ह आढळुन आल्यास तांतडीने ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करावे.

तसेच शेतीमाल विक्रीस आलेल्या शेतकरी बांधवांना एका वाहनासोबत एका व्यक्तीस प्रवेश द्यावा. लिलावाच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी आणि कोरोना विषाणुपासुन सुरक्षित राहण्यासाठी सतत सॅनीटाझर व मास्क वापरणेसह सर्व मार्केट घटकांचे प्राधान्याने लसीकरण करून घेण्याच्या सुचना दिल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी