rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लग्नाच्या वाढदिवस पश्चाताप दिन!

viral letter
, गुरूवार, 31 मार्च 2022 (08:28 IST)
अमरावती (Amravati) शहरात सध्या एक लेटर सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात व्हायरल होण्यासारख अस काय आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.याचं उत्तर असं आहे की, पोलीस अंमलदाराने  लग्नाच्या वाढदिवसासाठी  सुट्टीसाठी केलेला अर्ज. हा अर्ज नेमका काय केलाय तो वाचूयात…
 
अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ दस्तगिर पोलीस स्टेशनला  कार्यरत विनोद राठोड या पोलीस अमलदाराचा २९ मार्च रोजी लग्नाचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त २७ मार्चची साप्ताहिक रजा २९ मार्चला बदली करून द्यावी अशी विनंती करणारा अर्ज त्यांनी ठाणेदाराला लिहीला होता. विषेश म्हणजे या अर्जात सुट्टीसाठी हव्या असलेल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या कारणासमोर कंसात पश्चाताप दिन असा उल्लेख केला. लग्नाला पश्चाताप दिन असा उल्लेख केल्याने या अर्जाची एकच चर्चा आहे.
 
पोलीस दलातील या विशेष विनंती अर्जाची सध्या सर्वत्र चर्चा होते आहे.अर्जाची ही प्रत सर्वत्र व्हायरल होत असून या प्रकाराची चर्चा संपूर्ण पोलिस दलात आता रंगू लागली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुकानदारांनो, तुमच्यासाठी लागू झाला हा नियम; राज्य सरकारने काढले आदेश