महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने नंतर आता तरुण भावांसाठी लाडका भाई योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरात लाडला भाई योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत 12वी उत्तीर्ण तरुणांना सरकार दरमहा 6,000 रुपये, डिप्लोमा करणाऱ्या तरुणांना 8,000 रुपये आणि पदवीधर तरुणांना 10,000 रुपये प्रति महिना देणार आहे.
या योजनेची घोषणा होतातच राज्यात राजकीय वारे वाहत आहे.विरोधकांनी यावर टीका करायला सुरु केली आहे. उद्धव ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे सरकारवर यावरून टीकास्त्र सोडले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी हे स्टंट असल्याचे बोलले जात आहे. या सर्व घोषणा विधानसभा निवडणुकीला लक्षात घेऊन केल्या जात असून या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी निधी कुठून येणार?
महाराष्ट्राचे कर्ज सातत्याने वाढत असताना तरुणांना पगार कुठून मिळणार?तरुणांना प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड देण्याची योजना पूर्वी पासून सुरु असून त्या योजनेला नवीन नाव देण्यात आले आहे.
सर्व सरकारी नौकऱ्या संपल्या असून तरुण युवक कंत्राटावर घेत असाल तर अशा घोषणा द्याव्या लागणार.
हे शिंदे सरकार दोनच गोष्टी करत आहे. भ्रष्टाचार आणि योजनांच्या घोषणा, पण या सगळ्याचा काही फायदा होणार नाही. लोकसभा निवडणुकीत महायुतीची जी अवस्था झाली तीच विधानसभा निवडणुकीत होणार आहे कारण जनतेला सर्व काही समजले आहे.