राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे नागपूरहून गडचिरोली हेलिकॉप्टरने जात असताना खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे हेलीकॉप्टर भरकटला. मात्र वैमानिकाने प्रसंगावधान राखत आपल्या कौशल्याने हेलिकॉप्टर रुळावर आणत गडचिरोलीत सुरक्षित लँडिंग केले.
फडणवीस, पवार आणि सामंत हे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात सुरजगड इस्पातच्या 10,000 कोटी रुपयांच्या एकात्मिक पोलाद प्रकल्पाच्या पायाभरणीसाठी आले होते.
या संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, माझ्या पोटात गोळा आला मात्र फडणवीस शांत होते.मला चहूकडे ढग दिसत होते.मी फडणवीस यांना देखील ढगांकडे पाहण्यास सांगितले. मला लँडिंगची काळजी वाटत होती. खराब हवामानामुळे हेलीकॉप्टर भरकटला. मला काळजी वाटत होती. मात्र फडणवीस शांत होते. निश्चिन्त बसले होते.
ते म्हणाले, मी सहा वेळा अपघातातून बचावलो आहे. आपण सुखरूप जाऊ काळजी करू नका. उदय सामंतांनी मला लँडिंगच्या जागेवर लक्ष ठेवण्यास सांगितले. लँडिंग झाल्यावर मी सुटकेचा श्वास सोडला.
अजित पवार यांनी हेलिकॉप्टरचे सुरक्षित लँडिंग करण्याच्या वैमानिकाच्या कौशल्याचे कौतुक केले.ते म्हणाले, "हेलिकॉप्टरने नागपूरहून गडचिरोलीला सुरक्षितपणे उड्डाण केले.